किचन टिप्स.
१.अंडी शिजवताना त्यात थोडे तेल टाका, शिजताना अंड्याला तडा जाणार नाही.
२.साखरेला मुंग्या लागू नये म्हणून त्यांत २/४ लवंग टाकाव्यात.
३. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी कांदा कापण्याआधी तासभर फ्रिज मधे ठेवून मग कापावा किंवा कांद्याचे दोन भाग करून ५ मिनिटे पाण्यात ठेवून मग कापायला घ्या.
४. लसूण लवकर सोलून व्हाव्यात यासाठी त्या दहा मिनिटं पाण्यामध्ये ठेवा आणि नंतर सोला.
५. भेंडी चिरताना चाकुला किंवा सुरीला थोडासा लिंबूचा रस लावा ,भेंडी चिरताना चिकटपणा जाणवणार नाही आणि चवही वाढेल.
६. चपात्या खूप वेळ मऊ राहाव्यात यासाठी चपातीच्या डब्यामध्ये थोडसं आलं ठेवा.
७.भरीत बनवताना वांग्याला थोडे तेल लावून घ्या त्यामुळे वांगे लवकर भाजले जाईल.
८. पावसाळ्यात मीठ आर्द्रता शोषून घेते आणि ओलसर होते हे टाळण्यासाठी मिठामध्ये थोडेसे तांदळाचे दाणे टाका.
९. डाळ किंवा वरण बनवायचे असल्यास कुकर मध्ये शिजवतानाच त्यामध्ये थोडी हळद आणि हिंग टाकून शिजवा त्याने स्वादही चांगला येतो आणि सुगंधही.
१०. बऱ्याच वेळा मुगडाळ आर्द्रतेमुळे चिकटते त्यासाठी डाळ अगदी कमी आचेवर अर्धा ते एक मिनिट भाजून घ्या म्हणजे डाळ सुट्टी राहील.
Useful tips
ReplyDelete