Posts

Showing posts with the label Halkova

मैदा बर्फी हालकोवा

Image
साहित्य : १/२ वाटी तूप  १ वाटी मैदा १ वाटी पिठीसाखर पाव चमचा वेलची पूड कृती: कढईमध्ये अर्धा वाटी तूप टाका. नंतर त्यामध्ये एक वाटी मैदा टाकून मंद आचेवर दहा ते बारा मिनिटं परतवून घ्या. आता गॅस बंद करा आणि मिश्रण पंधरा मिनिटांसाठी गार होऊ द्या. मिश्रण गार झाल्यावर त्यात १ वाटी पिठीसाखर व पाव चमचा वेलची पूड घाला व व्यवस्थित एकजीव करून घ्या. तयार झालेले मिश्रण ताटात काढून त्याच्या वड्या पाडाव्यात.   मैदा बर्फी (हालकोवा) खाण्यासाठी तयार आहेत.😃